गांगुलीचा रेकॉर्ड डिव्हिलिअर्सने मोडला
जोहान्सबर्ग: न्यूझीलंडविरोधात वन डे सामन्यात ८००० धावा दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सने पूर्ण केल्या असून डिव्हिलिअर्सने सर्वात कमी डाव...
https://mllivetestimpress.blogspot.com/2015/08/blog-post_37.html
जोहान्सबर्ग: न्यूझीलंडविरोधात वन डे सामन्यात ८००० धावा दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्सने पूर्ण केल्या असून डिव्हिलिअर्सने सर्वात कमी डावात हा टप्पा गाठण्याचा विक्रम केला आहे.
डिव्हिलिअर्सने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेचा डाव ५० षटकांत ७ विकेट्सच्या मोबदल्यात २८३ धावांवर आटोपला. डिव्हिलिअर्सने त्याच्या १८२ व्या डावात हा टप्पा गाठला आहे आणि अशाप्रकारे त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडला असून गांगुली २०० डावांमध्ये ८००० धावा केल्या होत्या. या दोघांनंतर सचिन तेंडुलकर (२१० डाव) ब्रायन लारा (२११) आणि महेंद्र सिंह धोनी (२१४ डाव) यांचा क्रमांक लागतो. डिव्हिलिअर्सने न्यूझीलंडविरोधातील तिसऱ्या वन डेत १९वी धाव पूर्ण केली आणि हा विक्रम रचला. अशाप्रकारे त्याच्या नावावर आता १९० सामन्यांपैकी १८२ डावात ८०४५ धावा जमा झाल्या आहेत, यात २० शतके आणि ४७ अर्धशतकांचा समावेश आहे.







