रामकुंडावर पहिले शाही स्नान, महंत ग्यानदासांनी लावली डुबकी
नाशिक =एका तपानंतर नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या शाहीस्नानाला सुरूवात झाली आहे.. त्र्यंबकेश्वरमधल्या कुशावर्तावर पहाटे सव्वा चार वाजता शाही स्न...
https://mllivetestimpress.blogspot.com/2015/08/blog-post_58.html
नाशिक =एका तपानंतर नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या शाहीस्नानाला सुरूवात झाली आहे.. त्र्यंबकेश्वरमधल्या कुशावर्तावर पहाटे सव्वा चार वाजता शाही स्नान पार पडलं. जुना आखाडा, अग्नी आखाडा, आवाहन आखाड्याच्या साधूंनी कुशावर्तावर शाहीस्नान केलं.
महाराष्ट्रातील सिंहस्थ कुंभनगरी अर्थात नाशिकमध्ये पहिल्या पर्वणी शाही स्नानाला आज (शनिवार) पहाटे प्रारंभ झाला. गोदावरी नदीच्या तिरावरील त्र्यंबकेश्वराला कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-महंतांच्या शाही मिरवणुकीला पहाटे साडे तीन वाजता सुरुवात झाली.
गुरू, सुर्य आणि मंगळ ग्रहांच्या परस्पर सहवास आणि त्यातुन निर्माण झालेल्या पवित्र सिंहस्थ पर्वात ईस्टदेवतांना स्नान करून येथील रामकुंडात आज मंत्रोच्चार, श्रीरामाच्या जयघोषात पहिले शाही स्नान झाले. हजारो भाविकांनी त्याचे साक्षीदार होत डोळ्याचे पारने फेडले.
मिरवणुकीच्या अग्रभागी मिरवणूकीचे नियंत्रण हरिव्यासी निर्वाणी आखाड्याचे महंत हरिशंकरदास घोड्यावर स्वार होते. अनीची हनुमंत विराजमान असलेला लाल त्रिकोणी झेंडा घेऊन नागा आतीत ऐटीत चालले होते. त्यांच्यामागे साधूंची फौज ईस्टदेवता, निदान घेऊन मार्गक्रमन करीत होती. हनुमानजींनंतर श्रीजींची प्रतिमा होती. महंत जगन्नाथदास मिरवणूकीचे नियंत्रण करीत होते. वाद्यपथक रामधून वाढवित होते. चतु:संप्रदायचे खोजी त्रिवेणीधाम पीठिधीश्वर नारायणाचार्य आणि अनीचे महंत जगन्नाथदास तसेच दुसरा रथावर महंत धर्म वास आणी चतु:संप्रदायचे महंत फुलडोल बिहारीदास रासबिहारीदास होते. त्यांच्यामागे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास व खालसांचे महंत होते. महामंत्री महंत गौरीशंकरदास मिरवणूकीचे व्यवस्थापन करीत होते. ग्यानदास महाराजांचे उत्तराधिकारी महंत संजयदास, महंत हेमंतदास आदी होते.
पहाटे चारपासूनच शाही मिरवणुकीची धांदल सुरू झाली होती. वैष्णव नागा रात्रभर मिरवणुकीच्या गाड्या सजवतो होते. पारंपारीक पट्टे, तलवारी, भावले आदी शस्त्रास्त्रांना चकचकीत करीत सोते. रामधून व भंजन गात होते. रात्रीचा प्रहर जसा सरकत होता तशी या उत्साहाला वाद्यांचीही संगत लाभली अन् साधूग्राम हनमानभक्तांच्या आरोळ्यांनी चैतन्याने भारले होते. मिरवणुक व त्याचा उत्साह अदभूत होता. त्यावर पोलिस बारीक लक्ष ठेउन होते. प्रत्येक आखाड्यात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दुसरीकडे, नाशिकमध्ये शाही मिरवणुकीनंतर आता रामकुंडावर शाही स्नानाला प्रारंभ झाला आहे. महंत ग्यानदास यांनी पहिली डुबकी लगावली. दिगंबर, निर्वाणी आणि निर्मोही आखाड्याचे साधू रामकुंडात शाही स्नान करतील. शाहीमार्गावर रांगोऴ्यांच्या पायघड्यानी साधू-महंतांचे स्वागत केले जात आहे. निर्वाणी आखाड्यातील साधूंना सर्वप्रथम शाही स्नानाचा मान असेल. त्यानंतर दिंगबर आणि निर्मोही आखाड्यातील साधू स्नान करतील.
नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ८० लाख ते एक कोटी भाविक दाखल झाले आहेत. पहिल्या शाही स्नानाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.
साधू-महंतांच्या शाही स्नानानंतर भाविकांसाठी रामकुंड व कुशावर्त खुले करण्यात येणार आहे. नाशिकला सकाळी ९, तर त्र्यंबकेश्वरला साडे दहा वाजता शाहीस्नानाचा सोहळा संपन्न होईल.