शेतकर्‍यांच्या विरोधातील हे ‘सरकार’ बदला.... शरद पवारांची ‘हाक’

महाराष्ट्र लाईव्ह वृत्त:-:-  दि. 13/11/2015             टाटा-बिर्लारख्या केवळ आठ उद्योगपतींचे वर्चस्व असलेले पोलाद उद्योग संकटात आले तेंव्हा...

महाराष्ट्र लाईव्ह वृत्त:-:- दि. 13/11/2015

            टाटा-बिर्लारख्या केवळ आठ उद्योगपतींचे वर्चस्व असलेले पोलाद उद्योग संकटात आले तेंव्हा या सरकारने साठ हजार कोटींची मदत केली मात्र साखर कारखान्यांवर जगणार्‍या लाखो शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी व साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी दहा-बारा हजार कोटी देण्यासही हे सरकार तयार नाही. या सरकारची एकूणच सर्व धोरणे शेतकर्‍यांच्या विरोधात आहेत. असे हे शेतकरी विरोधी सरकार बदलण्याची हाक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिली.

                   कारखान्याचे संस्थापक, व्हाईस चेअरमन यशवंतराव पाटील आणि श्रीधर पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचा कार्यक्रम पवार यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे होते. 

आजचा कार्यक्रम ही संघर्षाची नांदी : हर्षवर्धन पाटील
जिल्हाधिकारी स्वत:ला काय समजतात:विखे-पाटील
दारु बंद झाली तर खासदारांचे कसे होणार : शरद पवार

                        व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, लक्ष्मण ढोबळे, खा. धनंजय महाडिक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष आ. भारत भालके, आ. बबनराव शिंदे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. दीपक साळुंखे-पाटील, दत्तात्रय सावंत, रामहरी रुपनर, माजी आमदार दिलीप माने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, आनंदराव पाटील, मनोहर डोंगरे, संजय शिंदे, कल्याणराव काळे, शिवाजी कांबळे, आर डी पाटील, लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते. पवार म्हणाले की, केंद्र सरकारचे कृषी संदर्भातील धोरण योग्य नाही. 
                       साखर कारखानदारी धोक्यात असतानाही याबाबत ठोस उपाय शासनाकडून केले जात नाहीत. आज साखरेचा भाव 2400 रुपये आहे वास्तविक साखरेचा भाव 3200 पेक्षा कमी असता कामा नये कारण जितका साखरेचा भाव कमी तितका उसाचा भाव कमी होऊन शेतकर्‍यांचे आणि कारखान्यांचे नुकसान होणार आहे. शेतकरी वाचला पाहिजे असे धोरण ठेवले पाहिजे. असेही पवार यांनी सांगितले.

आजचा कार्यक्रम ही संघर्षाची नांदी : 

हर्षवर्धन पाटील नवे सरकार हे बहिरे आणि आंधळ्यांचे सरकार आहे. त्यांना मागण्या मागून त्या पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे या सरकारच्या विरोधात आता संघर्ष केल्याशिवाय शेतकर्‍यांना न्याय मिळणार नाही. त्या संघर्षाची नांदी म्हणजेच आजचा हा कार्यक्रम आहे जिथे सर्व दिग्गज मंडळी एकत्रित आली आहेत, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. पंढरपूर: येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ आणि कारखान्याचे संस्थापक, व्हाईस चेअरमन यशवंतराव पाटील आणि श्रीधर पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी केंद्र आणि राज्यशासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांवर तोफ डागली. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांवर मोठा संघर्ष उभारण्याचा संकल्पही विरोधकांनी केला. 

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी महसूलमंत्री पतंगराव कमद, यांच्यापासून ते खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यापर्यंत व आ. भारत भालके यांच्यापर्यंत सगळ्यांनी शासनावर तक्रारीची तोफ डागली. 

जिल्हाधिकारी स्वत:ला काय समजतात:विखे-पाटील 

जिल्हाधिकारी स्वत:ला समजतो काय? दुष्काळी दाह असतानाही व लोकांची मागणी असतानाही टॅँकर दिले जात नाही, की पाणी सोडले जात नाही, उद्या पीक जळाले तर सरकार भरपाई देणार का? जिल्हाधिकार्‍यांच्या या वृत्तीमुळे शासन कोण चालवते लोकप्रतिनिधी की प्रशासन याचीच शंका येते, अशा शब्दांत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांचा समाचार घेतला.

दारु बंद झाली तर खासदारांचे कसे होणार : शरद पवार

कारखान्यातून अल्कोहोल निर्मिती व्हावी, मात्र त्यापासून दारूची निर्मिती होऊ नये, अशी प्रामाणिक इच्छा कारखान्याच्या स्थापनेपासून संचालकांची आहे. मात्र दारू तयार न होणे चांगले असले तरी, दारु न झाल्यास तुमच्या खासदारांचे कठीण होईल, अशी कोपरखळी यावेळी शरद पवार यांनी सोलापूरच्या खासदारांचे नाव न घेता मारली. दिल्लीत असल्यामुळे त्या खासदारांचे अनेक किस्से ऐकायला मिळत असल्याचे गुपितही त्यांनी सभेत सांगितले. 

पुण्यातील चार धरणांमधून उजनीत दहा टीएमसी पाणी सोडले पाहिजे, यासाठी जलसंपत्ती प्राधिकरणाने सकारात्मकता दर्शविल्यानंतर सरकारने पाणी सोडण्याऐवजी हे प्रकरण मुद्दाम न्यायालयात ढकलले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सात दिग्गज नेत्यांनी आज पंढरपुरात केली.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्प आणि गाळप विस्तारीकरणाच्या कार्यक्रमात आज राज्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे चार माजी मुख्यमंत्री आणि चार माजी मंत्री एकाच मंचावर आले होते. यावेळी भाषणात प्रत्येक मंत्र्याने पुण्यातील चार धरणांतील दहा टीएमसी पाणी उजनीत सोडण्याविषयी सरकारवर सडकून टीका केली. पवार म्हणाले की, पाण्याच्या प्रश्नावरून वाद कशाला हवा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आल्यावर केवळ माणुसकी असली पाहिजे, विरोध नको. प्रारंभी हर्षवर्धन पाटील यांनी हे सरकार शेतकर्‍यांच्या विरोधात असल्याचे सांगत पाणी सोडलेच पाहिजे, त्यासाठी संघर्ष करु, असे सांगितले. 

त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जर पाण्याअभावी पिके करपली तर त्या होणार्‍या नुकसानाची भरपाई राज्य सरकारनेच दिली पाहिजे, नाही तर पाणी सोडले पाहिजे, अशी मागणी केली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, उजनीत पाणी सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे, मात्र निर्णय घेण्याऐवजी तालुक्या-तालुक्यात आणि जिल्ह्या-जिल्ह्यात भांडणे लावण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. ही वृत्ती सोडून शेतकर्‍यांचे हित लक्षात घेतले पाहिजे. सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, अधिकार्‍यांकडून पाणी न सोडण्याची चूक झाली असेल, मात्र त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून आणि कॅबिनेट मंत्री मंडळाकडून पाणी सोडण्याचा आदेश का होत नाही, याचा विचार केला पाहिजे.

Post a Comment

emo-but-icon

आपला आगमन क्रमांक आहे

व्हिडीओ

दिनांक

आमचा अॅप डावुनलोड करा

आमचा अॅप डावुनलोड करा

Like Us On Facebook

Side Ads

Follw us on Twitter

Contact Us

Name

Email *

Message *

item