भावजयीने घडवुन आणला दिराचा खुन.... 25 हजाराची दिली सुपारी... बिड जिल्ह्यातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना...

             बीड : परळीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चक्क दिराचा खून करण्यासाठी त्याच्याच वहिनीने 25 हजार रुपयांची सुपारी दिली. परळी तालु...

             बीड : परळीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चक्क दिराचा खून करण्यासाठी त्याच्याच वहिनीने 25 हजार रुपयांची सुपारी दिली. परळी तालुक्यातील लेंडेवाडीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी भावाच्या बायकोला अटक केली. तर सुपारी घेणारा फरार आहे.


परळी - घाटनांदूर मार्गावर 4 नोव्हेंबर रोजी एका युवकाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर हा मृतदेह उत्तम राजाराम फुगनर (35) याचा असल्याचे स्पष्ट झाले.

उत्तमची पत्नी बारा वर्षांपासून माहेरीच होती. या तपासात उत्तमचा भाऊ आणि पत्नीच्या जबाबात परस्परविरोधी नावे येत होती. दरम्यान, पोलीस तपासात वेगळीच माहिती समोर आली. उत्तमच्या भावाची पत्नी तानुबाई बापूराव फुगनर हिची पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी आपण 25 हजार रुपयांची सुपारी दिल्याचे कबुली दिली. ही सुपारी नातलग राजेश सोडगीर याला दिली आणि दिराचा काट काढण्यास सांगितले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

पोलिसांनी खूनप्रकरणी तानुबाईला मंगळवारी अटक केली. या प्रकरणातील सुपारी घेणारा राजेश सोडगीर फरार आहे. मात्र, हत्यामागील कारण समजू शकलेले नाही.

Related

राजकारण 6861809053189549072

Post a Comment

emo-but-icon

आपला आगमन क्रमांक आहे

व्हिडीओ

दिनांक

आमचा अॅप डावुनलोड करा

आमचा अॅप डावुनलोड करा

Like Us On Facebook

Side Ads

Follw us on Twitter

Contact Us

Name

Email *

Message *

item