पंढरपूरच्या नविन पुलावर अपघात... ट्रकने पाठीमागुन धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार....

      महाराष्ट्र  लाईव्ह वृत्त:- 14-11-2015 पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमधील नविन सोलापूर रोडच्या चंद्रबागेवरील पुलावर ट्रकने पाठीमागून जोर...

     महाराष्ट्र लाईव्ह वृत्त:-14-11-2015

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमधील नविन सोलापूर रोडच्या चंद्रबागेवरील पुलावर ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यु झाला आहे. ही दुर्घटना आज सकाळी 9:30 वाजणेच्या सुमारास घडली.

    याबाबत पंढरपूर शहर पोलस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 9:30 च्या सुमारास येथील पुलावरुन मणी तानु मणी पिलाई (रा.औदुंबर पाटील नगर, नावन्या बिल्डींग, प्लॉट नं. 46.16, लिंक रोड, पंढरपूर) हा प्रवास करत असताना (एम.एच.13 डीडी 6656) पाठीमागुन आलेल्या ट्रकने (केए-01 केई-1174) जोराची धडक दिली.  या घटनेत मणी पिलाई चा मृत्यु झाला असून याबाबतची फिर्याद विजय तानु पिलाई (वय-53) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. ट्रक चालक आरोपी एस. रामास्वामी, रा.तामिळनाडु यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतचा अधिक तपास पीएसआय कदम हे करत आहेत.

Related

राजकारण 1352237506221965868

Post a Comment

emo-but-icon

आपला आगमन क्रमांक आहे

व्हिडीओ

दिनांक

आमचा अॅप डावुनलोड करा

आमचा अॅप डावुनलोड करा

Like Us On Facebook

Side Ads

Follw us on Twitter

Contact Us

Name

Email *

Message *

item