रावसाहेब दानवे पुन्हा भाजप प्रदेशाध्यक्षपदी
मुंबई : रावसाहेब दानवे यांच्याच गळ्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र भाजपची सुत्रे दानवे यांच्या हातात आली...
https://mllivetestimpress.blogspot.com/2016/01/blog-post_31.html
मुंबई : रावसाहेब दानवे यांच्याच गळ्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र भाजपची सुत्रे दानवे यांच्या हातात आली आहेत. भाजपचे सरकार राज्यात आल्यानंतर प्रदेश भाजपची सुत्रे दानवे यांच्याकडे आली होती.
जालन्याचे रावसाहेब दानवे हे भाजपचे जूने कार्यकर्ते असून, ते ४ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील भाजपचा मराठा चेहरा म्हणून पाहिले जाते. मात्र, आपली प्रतिमा मराठा समाजाचा नेता म्हणून निर्माण करण्यात अद्याप त्यांना यश आले नाही. केंद्रात व महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यानंतर दानवे विषेश प्रसिद्ध झाले.






