मोहित शर्माचा गर्लफ्रेण्ड श्वेतासोबत साखरपुडा

नवी दिल्ली : आता सुरेश रैना, हरभजन सिंह, रोहित शर्मा आणि युवराज सिंहपाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूची विकेट पडली असून टीम इंडियाचा ...

नवी दिल्ली : आता सुरेश रैना, हरभजन सिंह, रोहित शर्मा आणि युवराज सिंहपाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूची विकेट पडली असून टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहित शर्मा वर्षाच्या सुरुवातीलाच आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. १७ जानेवारी रोजी मोहित शर्माचा गर्लफ्रेण्ड श्वेतासोबत साखरपुडा झाला. दिल्लीच्या मौर्य हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला.
केवळ दोन्ही कुटुंबातील सदस्यच या छोटेखानी सोहळ्यात उपस्थित होते. मोहितने फेसबुकवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केल्यानंतर याची माहिती मिळाली. यानंतर मोहित आणि श्वेतावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. मोहित शर्माची होणारी पत्नी श्वेता ही कोलकातामध्ये हॉटेल मॅनेजमेंट करत आहे. हे दोघे मागील अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दरम्यान, दुखापतग्रस्त मोहित शर्माची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेली नाही. आता त्याचं लक्ष ट्वेण्टी-20 वर्ल्डकपवर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्याने टीम इंडियाचा खेळाडू या सोहळ्यात उपस्थित नव्हता.
mohit-sharma

Related

क्रीडा-जगत 6258068021133454175

Post a Comment

emo-but-icon

आपला आगमन क्रमांक आहे

व्हिडीओ

दिनांक

आमचा अॅप डावुनलोड करा

आमचा अॅप डावुनलोड करा

Like Us On Facebook

Side Ads

Follw us on Twitter

Contact Us

Name

Email *

Message *

item