धोनीकडे पुण्याचे कर्णधारपद
नवी दिल्ली – टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याकडे आयपीएलच्या नवव्या हंगामात पुणे संघाचे कर्णधार सोपवण्यात आल्याचे संघमालक संजीव ...
https://mllivetestimpress.blogspot.com/2016/01/blog-post_90.html
नवी दिल्ली – टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याकडे आयपीएलच्या नवव्या हंगामात पुणे संघाचे कर्णधार सोपवण्यात आल्याचे संघमालक संजीव गोयंका यांनी सांगितले. त्यांनी ही घोषणा पुणे संघाच्या नव्या लोगोच्या अनावरणप्रसंगी केली. पुणे संघाचे नाव रायजिंग पुणे सुपरजायंटस (आरपीएसजी) असे असणार आहे. धोनी हा एक उत्तम खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने भारताला चांगले यश मिळवून दिल्यामुळे तो संघाला मैदानावर व मैदानाबाहेर उत्तम स्थितीत ठेवेल अशी आम्हाला खात्री असल्याचे गोयंका म्हणाले. स्टीव स्मिथ, डु प्लेसिस, अजिंक्य रहाणे व आर. अश्विन यांचा संघात समावेश आहे.







