बाजीराव-मस्तानीने जमविला ३५० कोटी रुपयांचा गल्ला

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव-मस्तानी’ने आता अजून एक विक्रम केला असून आंतरराष्ट्रीय कलेक्शन्स मिळून या चित्रपटाने एकूण ३५० कोटी रु...


संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव-मस्तानी’ने आता अजून एक विक्रम केला असून आंतरराष्ट्रीय कलेक्शन्स मिळून या चित्रपटाने एकूण ३५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
शाहरुखच्या ‘दिलवाले’ सोबतच हा चित्रपट १८ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यामुळे त्याच्या कलेक्शन्स विषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या. भन्साळींचे ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा चित्रपट त्यांना खरे तर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना घेऊन करायचा होता. पण, ते काही शक्य झाले नाही. भारतीय बाजारात या चित्रपटाने २६० कोटींचा गल्ला जमवला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात ९० कोटींची कमाई केली आहे. तर शाहरूखच्या दिलवालेने ३८० कोटी रुपये कमावले आहेत. ३५० कोटींचा गल्ला जमावणाऱ्यांच्या यादीत आत्तापर्यंत पीके, बजरंगी भाईजान, धूम-३, चेन्नई एक्सप्रेस, प्रेम रतन धन पायो, थ्री इडियट, हॅप्पी न्यू ईयर, किक आणि क्रिश-३ या चित्रपटांचा समावेश आहे.

bajirao-mastani

Related

सिनेमा रिव्हू 5202775840501005443

Post a Comment

emo-but-icon

आपला आगमन क्रमांक आहे

व्हिडीओ

दिनांक

आमचा अॅप डावुनलोड करा

आमचा अॅप डावुनलोड करा

Like Us On Facebook

Side Ads

Follw us on Twitter

Contact Us

Name

Email *

Message *

item